थेट मजकुराकडे जा
GateSetu

भारतातल्या प्लांट मालकांसाठी

गेटमधून कोणता ट्रक कधी गेला, ते रोज रात्री. तुमच्या व्हॉट्सॲपवर.

AI Enabled Camera Tracking System

गेटवर एक कॅमेरा. आत-बाहेर जाणारा प्रत्येक ट्रक मोजतो, नंबर प्लेट वाचतो, भरलेला की रिकामा ते बघतो.

रोज रात्री व्हॉट्सॲपवर रिपोर्ट, आणि वेळेनंतर ट्रक हलला तर लगेच फोटो.

नेट नसतानाही दिवसेंदिवस चालतं. मराठी, हिंदी, इंग्रजीत. स्टाफला लॉगिन नाही, कुणाला काही टाइप करायचं नाही.

तुमचा गेट, गेटसेतुच्या नजरेतून. भरलेला बाहेर, रिकामा आत — दोन्ही मोजले जातात.

क्रशरवरचा एक उदाहरण दिवस

चार आकडे, आणि त्यातला एक खरेपणाचा

आत आले
50आत आले
भरलेले बाहेर
47भरलेले बाहेर
रिकामे बाहेर
1रिकामे बाहेर
माल माहीत नाही
3माल माहीत नाही

शेवटचा आकडा इतर सिस्टीम लपवतात. ज्या ट्रकचा माल कॅमेऱ्याला ठरवता आला नाही, तो तरीही मोजला जातो आणि तुम्हाला दाखवला जातो — गुपचूप बेरजेत टाकला जात नाही.

रजिस्टर तोच माणूस लिहितो ज्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे

प्लांटमधून काय गेलं याची तुमच्याकडे एकच नोंद आहे: गेटचं रजिस्टर. जो लिहितो, तोच एखादा ट्रक गाळू शकतो. ती तूट तुम्हाला महिन्यांनी स्टॉकमध्ये दिसते, दिसली तर. गेटसेतु तुम्हाला दुसरा आकडा देतं, जो साइटवरचं कुणीही बदलू शकत नाही.

एकाच दिवसाचे दोन हिशेब

एक आकडा तुमच्याकडे आधीच आहे. गेटसेतु दुसरा आकडा देतो, वेगळ्या पद्धतीने काढलेला — म्हणजे दोन्हींची तुलना करता येते.

गेट रजिस्टर

ज्यांच्यावर लक्ष ठेवायचं, तेच लिहितात

  • सकाळी 6:52 — MH12AB1234 — भरलेला
  • सकाळी 7:19 — MH14CX4521 — भरलेला
  • संध्याकाळी 5:40 — MH16TR5566 — भरलेला
  • दिवसाची बेरीज
  • 47 44

पेनने आकडा एका क्षणात बदलतो. फरक महिन्यांनी स्टॉकमध्ये कळतो, कळला तर.

कॅमेऱ्याचा हिशेब

साइटवरचं कोणीही तो बदलू शकत नाही

  • प्रत्येक हालचाल एकदाच लिहिली जाते, कधीच बदलली जात नाही.
  • प्रत्येक नोंद आधीच्या नोंदीशी जोडलेली असते.
  • एक नोंद काढली किंवा बदलली, तर साखळी जुळत नाही.
  • Aariko सपोर्टसुद्धा नोंद बदलू शकत नाही.

आजची साखळी तपासली — बरोबर

कधी तपासणी चुकली, तर रात्रीच्या मेसेजच्या पहिल्याच ओळीत ते सांगितलं जातं.

रोज रात्री व्हॉट्सॲपवर काय येतं

तुम्ही ठरवलेल्या वेळेला प्लांटच्या प्रत्येक मालकाला एक मेसेज. बिल बुकशी जुळवायला तीस सेकंद पुरे.

मेसेजचा नमुना

आज — ६ सप्टेंबर

47 ट्रक आत · 46 भरून बाहेर · 1 रिकामा बाहेर

कॅमेरा बंद 02:10–05:40 (लाइट)

अंदाजे माल: ~1,050 टन (अंदाज)

⚠️ संध्याकाळी 7:00 नंतर 2 हालचाली

⚠️ MH12AB1234 च्या 6 खेपा (नेहमी 2)

⚠️ 3 गाड्या ओळखल्या नाहीत — फोटो खाली

पूर्ण यादी: ॲप उघडा

21:00 ✓✓

फोनवर गेटसेतुची आजची स्क्रीन: १९ भरलेले ट्रक बाहेर, २५ आत आले, २ रिकामे बाहेर, ४ लोड अज्ञात, आणि २४ तासांची कॅमेरा कव्हरेज पट्टी ज्यात एक खंड दिसतो
आकडा
किती ट्रक आत, किती भरून बाहेर, किती रिकामे, आणि कॅमेऱ्याला किती ठरवता आले नाहीत. अंदाज कधीच नाही.
फोटो
ज्या ट्रकची प्लेट वाचता आली नाही त्याचा फोटो मेसेजमध्येच येतो, म्हणजे तुम्ही स्वतः ओळखू शकता.
संशयास्पद
इथे न भरता भरलेला बाहेर गेलेला ट्रक. नेहमी दोन खेपा करणारी प्लेट आज सहा खेपा. फक्त रात्रीच दिसणारी गाडी.
खरं सांगणारी ओळ
लाइट गेल्यामुळे कॅमेरा बंद होता तर मेसेजमध्ये वेळेसकट तसं लिहिलेलं असतं. अर्धवट आकडा पूर्ण म्हणून कधीच दाखवला जात नाही.

आणि कधीही, लगेच

वेळेनंतर ट्रक
रात्री 2:14 ला भरलेला ट्रक: नेट आल्यावर मिनिटभरात व्हॉट्सॲपवर फोटो आणि फोनवर नोटिफिकेशन. “पाहिलं” किंवा “आज नको” असं उत्तर द्या.
कॅमेऱ्यात गडबड
लेन्स झाकली, कॅमेरा फिरवला, लेन्सवर धूळ, बॉक्स ऑफलाइन: साध्या भाषेत एक मेसेज. लाइट गेली तर ‘लाइट गेली’ असंच येतं, छेडछाड म्हणून नाही.
कॅमेरा कव्हरेज · 24 तास21.5 / 24 तास
रात्री 12सकाळी 6दुपारी 12संध्या 612

रात्री 3:10 – 5:40 वीज नव्हती — कॅमेरा बंद होता.

इतर सगळे असं भासवतात की कॅमेरा कधीच बंद पडत नाही. आम्ही खिडकी दाखवतो आणि कारणही सांगतो — कारण ज्या हिशेबावर विश्वास ठेवायचा, त्याने काय सुटलं हे मान्य केलं पाहिजे.

तीन पायऱ्यांत कसं चालतं

  1. 1

    तुमच्या गेटवर आम्ही एक कॅमेरा बसवतो

    रस्त्याच्या कडेला खांबावर 4K कॅमेरा, एक छोटा बॉक्स, आमच्या सिमसह 4G राऊटर, आणि बॅटरी. आमचा माणूस बसवतो. तुम्हाला रोज काहीच करायचं नाही.

  2. 2

    बॉक्स प्रत्येक ट्रकवर नजर ठेवतो

    दिशा बघतो, प्लेट वाचतो, टिपरच्या डब्यात बघून भरलेला की रिकामा ठरवतो, आणि आत जाणं-बाहेर जाणं जोडून एक खेप बनवतो. नेट नसलं तरी आठवडाभर चालतो.

  3. 3

    तुम्हाला व्हॉट्सॲपवर रिपोर्ट येतो

    रोज रात्री एक मेसेज, वेळेनंतरचे ट्रक आणि कॅमेऱ्याच्या गडबडीसाठी लगेच अलर्ट, आणि प्रत्येक फोटो, प्रत्येक दिवस बघायला ॲप.

जिथून माल ट्रकने बाहेर जातो, त्या प्रत्येक गेटसाठी

तुम्ही काय विकता याच्याशी कॅमेऱ्याला देणंघेणं नाही. तो गाड्या मोजतो, प्लेट वाचतो, लोड बघतो. यंत्रणा तीच; तुमच्या रिपोर्टमधले शब्द बदलतात.

मालकांचा या आकड्यावर विश्वास का

कुणालाही बदलता येत नाही
प्रत्येक हालचाल एकदाच लिहिली जाते आणि SHA-256 हॅशने आधीच्या नोंदीला जोडली जाते. स्टाफ नाही, तुम्ही नाही, आमची सपोर्ट टीमसुद्धा नंतर नोंद बदलू शकत नाही.
जे दिसलं नाही ते प्रामाणिकपणे सांगतं
मोठ्या लोडशेडिंगमध्ये बॅटरी संपली? रिपोर्टमध्ये “कॅमेरा बंद 02:10–05:40” असं लिहून येतं. ज्या ट्रकचा लोड ठरवता आला नाही तो “अज्ञात” म्हणून मोजला जातो, अंदाजाने नाही.
नेटशिवाय चालतं
सगळं आधी गेटवरच साठवलं जातं आणि 4G आल्यावर वर पाठवलं जातं. सात दिवसांचा साठा. फोटो काढण्यात क्लाउडचा काही संबंध नाही.
स्टाफला लॉगिन नाही, कधीच
साइटवरचं कुणीही काहीही भरत नाही. फक्त मालक लॉगिन करतो, व्हॉट्सॲप OTP ने. आरिकोच्या सपोर्टने काही केलं तर त्याची नोंद ॲपमध्ये तुम्हाला दिसते.
तुमची भाषा
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी, प्लांटनुसार ठरवा. व्हॉट्सॲप मेसेज, अलर्ट आणि ॲपची प्रत्येक स्क्रीन त्याच भाषेत.
कोणताही फोन
आयफोन असो की ८,००० रुपयांचा अँड्रॉइड. ॲप हलकं आहे, आधी छोटे फोटो दाखवतं, आणि रेंज नसली तरी मागचा आठवडा दाखवतं.
गेटसेतुची अलर्ट स्क्रीन: भरलेल्या ट्रकचा फोटो, प्लेट आणि ‘पाहिलं’ व ‘आज नको’ बटणं असलेला वेळेनंतरच्या हालचालीचा अलर्ट

अलर्ट

एका गेटपासून सुरुवात करा

प्लांटचा प्रकार आणि गाव सांगा. बसवणं कसं होईल आणि किती खर्च येईल ते आम्ही सांगतो.

Powered by Aariko Systems

व्हॉट्सॲप करा