गेटवरची अडचण
- डिलिव्हरी वेळापत्रकाबाहेर भरून बाहेर जाणारे मिक्सर.
- न झालेल्या खेपांचं डिझेल आणि तास बिलात, किंवा झालेल्या खेपा बिलातच नाहीत.
- रात्रीच्या पोअरसाठी पहाटे 3 ला ट्रक बाहेर, आणि त्यातच पहाटे 3 ला बाहेर नसायला हवे असे ट्रक.
- अनेक प्लांट, एक मालक, एक फोन.
गेटसेतु काय देतं
- प्रत्येक मिक्सरची बाहेर जाण्याची आणि परतण्याची अचूक वेळ, खेपांत जोडलेली, कालावधीसह.
- ठरलेल्या रात्रीच्या पोअरसाठी एका टॅपने थांबवता येणारे वेळेनंतरचे अलर्ट.
- एकापेक्षा जास्त प्लांट असणाऱ्या मालकांसाठी ॲपमध्ये प्लांट बदलण्याची सोय.
- ट्रान्सपोर्टर आणि ड्रायव्हरचे वाद मिटवायला प्रत्येक गाडीचा खेपांचा इतिहास.

रात्रीचा मेसेज साधारण असा
22 मिक्सर बाहेर · 22 आत. ⚠️ MH14CX4521: 5 खेपा (नेहमी 3). ⚠️ रात्री 9:00 नंतर 3 हालचाली — रात्रीचा पोअर, सकाळी 6:00 पर्यंत अलर्ट थांबवले.
21:00 ✓✓
सगळे प्रकार
तोच कॅमेरा, तोच बॉक्स, तोच रिपोर्ट. फरक एवढाच की कोणत्या ट्रकच्या हालचालीत तुमचे पैसे जातात. तुमच्या प्लांटचा प्रकार निवडा.
तुमच्या प्लांटबद्दल बोला
प्लांटचा प्रकार आणि गाव सांगा. बसवणं कसं होईल आणि किती खर्च येईल ते आम्ही सांगतो.
Powered by Aariko Systems