थेट मजकुराकडे जा
GateSetu

आरिको सिस्टिम्सबद्दल

आम्ही पुण्यातली एक छोटी सॉफ्टवेअर कंपनी. भारत ज्यांच्यावर चालतो त्या धंद्यांसाठी आम्ही साधनं बनवतो: पेट्रोल पंप, क्रशर, यार्ड, गोदामं. जिथे IT स्टाफ नाही, मालक फोनवर आहे, आणि गेटवरच्या माणसांवर लक्ष ठेवायचं आहे.

आरिको सिस्टिम्सबद्दल

गेटसेतुची सुरुवात एका क्रशर मालकाच्या प्रश्नाने झाली: “कॅमेरे आहेत माझ्याकडे. तरी किती ट्रक गेले हे मला का कळत नाही?” कॅमेरे रेकॉर्ड करतात; बघतं कुणीच नाही. गेटसेतु कॅमेऱ्याला मोजायला लावतं, आणि मालक जिथे रोज बघतो त्याच व्हॉट्सॲपवर रोज रात्री आकडा पाठवतं.

आमचं दुसरं उत्पादन फ्युएलसेतु पेट्रोल पंपांवर चालतं: विक्री, उधारी, शिफ्ट आणि पंप मालकांसाठी रिपोर्ट. त्यातून शिकलेलं गेटसेतुत उतरलं आहे: डॅशबोर्डपेक्षा व्हॉट्सॲप, मराठी-हिंदी आधी, आणि साइटवरच्या कुणाला रोज काही करावं लागेल असं एकही फीचर नाही.

टीम छोटी आणि उत्पादन प्रामाणिक. कॅमेरा बंद होता तर तसं सांगतो. प्लेट वाचता आली नाही तर फोटो दाखवतो. सपोर्टसाठी तुमच्या प्लांटच्या सेटिंगला हात लावला तर त्याची नोंद तुम्हाला दिसते.

थोडक्यात

थोडक्यात

कंपनी
आरिको सिस्टिम्स, पुणे, महाराष्ट्र
उत्पादनं
गेटसेतु (प्लांटचं गेट), फ्युएलसेतु (पेट्रोल पंप)
भाषा
मराठी, हिंदी, इंग्रजी
संपर्क
support@gatesetu.com • व्हॉट्सॲप +91 96071 59239

आज रात्रीचा हिशेब आत्ताच तुमच्या फोनवर असू शकतो.

प्लांटचा प्रकार आणि गाव सांगा. बसवणं कसं होईल आणि किती खर्च येईल ते आम्ही सांगतो.

Powered by Aariko Systems

व्हॉट्सॲप करा